शिखांची ओळख (Indentity Of Sikh)

शिखांची ओळख सुरुवातीला, हे स्पष्ट केले पाहिजे की "सिख" हिंदू किंवा मुसलमानांच्या वर्गात मोडत नाही. जगातील प्रमुख धर्मांमध्ये "सिख धर्म" हा आहे ज्याच्या अनुयायांना जगभरात "सिंह" असे म्हणतात. जरी बहुसंख्य सिख पंजाबमध्ये राहत असले तरी, ते जगात सर्वत्र दिसून येतात.

जी स्त्री किंवा पुरुष या श्रुष्टीचा निर्माता, एकमेव परमेश्वर, जो काळापांसून सत्य होता, सत्य आहे, सत्य राहणार. जो काळा (मृत्यू) पलीकडे आहे. ज्याचा जन्म झालेलाच नाही, जो स्वयंभू आहे, व ज्यांस मरण हे नाही. जो सर्व प्राणिमात्राचा पालनकर्ता आणि अन्नदाता आहे. ज्याचा कोणी शत्रू नाही, ज्याचे कोणाशीही वैर नाही. जो व्यक्ती अश्या परमेश्वराची पूजा करतो, निरोगी मनाने त्याचे मनन करतो. मानवांची सेवा करतो, प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वराचा अंश पाहतो. आपल्या गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर चालतो. जो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. जी वक्ती आपल्या एकच पत्नी बरोबर पूर्ण आयुष्य जगतो. पर स्त्रीला आपली माता व बहीण मानतो. जो सत्यतेवर अटळ आहे. सर्व प्राणिमात्र एकाच पित्याचे संतान आहेत हे मानतो. परमेश्वराने जे सुख त्याचा नशिबात दिलेले आहे, त्याचे आभार मानतो. असा व्यक्तीच सिख धर्माचा अनुयायी व सिख होऊ शकतो.

प्रत्येक जाती धर्माचे, वेगवेगळ्या पेहराव्याचे, वेगवेगळ्या राहणीबाणीचे, वेगळे नियम असतात. सिख धर्म हा सर्वात नवीन व इतरांहून आगळा वेगळा आहे. शीख धर्माला २०१९ साली जवळजवळ ४२५ वर्ष अस्तित्वात येऊन झाली. सर्व मानव हे एक सारखे असतात, परंतु सिख इतरांपेखा वेगळा, म्हणजे चेहऱ्यावर दाढी, डोक्यावर पगडी (फेटा), गळ्यात कृपान, हातात लोखंडी कडा, डोक्याचं व दाढीचे न कापलेले केस, व केसांना सावरण्यासाठी लाकडी कंगवा बाळगणारा. शरीराने बळकट, मेहनती असा म्हणजे शिख. आपल्या करणीला परिपक्व व नेहमी गुरुंच्या मार्गावर चालणारा, म्हणजे सिख.

सिख म्हणजे कोणतीही व्यक्ती जी विश्वास ठेवते,

  1. एक अमर्याद सर्वोच्च अस्तित्व- (सिखाने देवाला ''अकाल पुरख'' किंवा वाहेगुरु असे संबोधले आहे)
  2. दहा सिख गुरु (१४६९ - १७०८) - गुरु नानक साहिब जी पासून गुरु गोबिंद सिंह साहिब जी पर्यंत
  3. गुरु ग्रंथ साहिब गुरबानी- (सिख 'पवित्र भजन)
  4. सिख गुरुांची शिकवण
  5. बाप्तिस्मा- (दहाव्या गुरुद्वारा दिलेली अमृत दिक्षा)
  6. डोक्याचे लांब केस, दाढी आणि मस्तकावर पगडी आणि महिलांसाठी डोक्यावर ओढणी (दुपट्टा)
  7. कोणत्याही जाती, वर्ग, रंग, पंथ, लिंग, पेशी, वंश किंवा प्रदेश वगैरे शिखांसाठी सामान, आणि इतर कोणत्याही धर्मावर निष्ठा नाही, म्हणूनच, सिख एक अद्वितीय व्यक्ती असून त्याला अद्वितीय पात्रता आणि ओळख आहे.

पगडी (दस्तार)

तुरबन

सिखांमध्ये पगडी (दस्तार) ही आदर, आत्म-सन्मान, धैर्य, अध्यात्म आणि पवित्रतेची निशाणी आहे. पगडी सिखां साठी गुरूंची अमूल्य भेट आहे. इतरांसाठी एक संकेत आहे की आम्ही अनंततेच्या प्रतिमेमध्ये राहत आहोत आणि सर्व सेवा देण्यास समर्पित आहोत.