त्यांचा जन्म भारतातील पाटणा येथ १६६६ मध्ये झाला आणि त्यांनी वडिलांचे गुरु, श्री गुरू तेग बहादुर यांच्या शहीदानंतर गुरु बनले.
त्यांनी १६९९ मध्ये सिखांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी खालसा पंथाची स्थापना केली. शिखांचे पंच प्यारेची सुरवात ही देखील त्यांनीच केली.
अनके वेळा सिख सैनिकांना, औरंगजेब आणि त्याच्या सहयोगी सैन्यांविरुद्ध त्यांनी अनेक लढाया लढविणास आमंत्रित करण्यात आले. त्यांनी आपल्या वडिलांना, आईला आणि चार मुलांना मुगल जुलमाद्वारे गमावले होते, त्यांनी औरंगजेबला आपला प्रसिद्ध पत्र (झफरनामा) लिहिला, ज्यात त्याने सम्राट मुगलला त्यांच्या विश्वासघातासाठी दोषी ठरवले.
लढाईत मारल्या गेलेल्या गुरूंच्या दोन पुत्राचे शव जेव्हा सिख सैनिक अंत्यसंस्कारा साठी शोधात होते, तेव्हा गुरु त्यांना म्हणाले, सर्व सिखांचे शव अंत्य संस्कार साठी एकत्रित करा, कारण सर्व मला माझ्या मुलां सारखेच समान आहेत. सर्वांचा अंत्यसंस्कार हा समान झाला पाहिजे.
श्री गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ श्री गुरु गोबिंदसिंहजींच्या हस्ते पूर्ण झाला. त्यांनी आपल्या नंतर श्री गुरु ग्रंथ साहिब हेच अंतःपर्यंत गुरु असतील असा आदेश दिला.
वडिलांचे नाव: गुरु तेग बहादूर जी, आईचे नाव: माता गुजरी जी, पत्नीचे नाव: माता जातो जी, माता सुंदरी जी, माता साहिब कौर जी असे होते.
श्री गुरु गोबिंद सिंह साहिब जी कुटुंब
