त्यांचा जन्म भारतातील अमृतसर येथे १६२१ मध्ये झाला.
त्यांनी आनंदपूर शहराची स्थापना केली. गुरुजींनी हिंदू धर्माचे संरक्षण, त्यांचे तिलक (भक्तीचे) आणि त्यांचे पवित्र (जेनऊ) जानवी यांचे संरक्षण केले. ते स्वातंत्र्यावर दृढ विश्वास ठेवणारे होते. सिख धर्माच्या प्रचारा साठी त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले जेथे अगोदरचे गुरु गेले नव्हते.
मुघल राजा औरंगझेबाने संपूर्ण भारतात लोकांना इस्लाम स्वकारण्यास प्रवृत्त करत होता, नाकारणाऱ्यास त्यांच्यावर तो क्रूरतेने अत्याचार करत असे. तेव्हा हिंदू लोक त्यांच्या जवळ आले व त्यांनी त्याच्या बाजूने आपले मत औरंगझेबा समोर मांडण्याची प्रार्थना केली. त्याने औरंगझेब समोर प्रस्ताव ठेवला की जर त्याने मला इस्लाम धर्म स्वीकार करू शकला तर सर्व हिंदू देखील इस्लाम धर्म स्वीकारतील. परंतु तसे झाले नाही तर सर्व हिंदू शांततेने राहतील.
त्यांनी स्वतःला आपल्या दोन शिष्यशा बरोबर औरंगझेबाच्या स्वाधीन केले, औरंगझेबानें त्यांना तुरुंगात डांबून भरपूर अत्याचार केले, त्याने गुरूंना दैवी चमत्कार दाखवण्याचं हुकूम सुद्धा केला, जो गुरुनी फेटाळला, गुरु त्याच्या अत्याचाराला मुकले नाहीत, हे पाहून त्याने गुरूंचे शीर धडापासून वेगळे करण्याचा आदेश दिला. आपल्या शेवटच्या नोट मध्ये त्यांनी लिहिले की, "हे सर्वात मोठे चमत्कार आहे. मी माझे डोके दिले, पण माझा विश्वास नाही.
वडिलांचे नाव: गुरु हरगोबिंद जी, आईचे नाव: माता नानकीं जी, पत्नीचे नाव: माता गुजरी जी