त्यांचा जन्म भारतातील वडाळी येथे १५९५ मध्ये झाला. ते श्री गुरु अर्जुन देव यांचे पुत्र होते, सिख धर्माला एक सशक्त धर्म बनवण्याची आवश्यकता आहे, त्या करीता त्यांनी सैन्य शिक्षणास सुरवात केली, ते स्वतः एक चांगले लढवैय होते. सिख सैनिक हा स्वतःहून आक्रमण करणार नाही तर, स्वतःचे स्वरक्षण करणारा आहे आणि जे स्वतः लढू शकत नाहीत त्यांच्या साठी लढणारा आहे.
गुरुजींनी शिकवले की कमकुवत आणि अत्याचार करणार्यांपासून वाचवण्यासाठी तलवार उचलणे आवश्यक आहे. विश्वाचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलनारे गुरुजी प्रथम गुरु होते. त्या वेळी केवळ सम्राट, ज्यांना एका उंच जागी बसण्याची परवानगी होती, त्याला तख्त किंवा सिंहासन म्हटले जात असे. गुरूंच्या मते तेथे फक्त्त देव किवां गुरु हाच बसू शकतो.
१३ वर्षांच्या वयात, श्री गुरु हरगोबिंदांनी श्री अकाल तखत साहिब बांधले. जमिनीपासून दहा फूट उंचीवर दोन तलवारी, एक मिरीची व एक पिरीची परिधान केल्या. जे आध्यात्मिक शक्तीचे प्रतिनिधीत्व करतात.
वडिलांचे नाव: गुरु अर्जन जी , आईचे नाव: माता गंगाजी, पत्नीचे नाव: माता दामोदरीजी, नानकी देवीजी