
हा आदिग्रन्थ सिख समुदायाचा प्रमुख धर्म ग्रंथ आहे. ज्याला "श्री गुरु ग्रंथ साहिब" असे ही म्हणतात. गुरु ग्रंथाची सुरवात पाचवे गुरु, श्री गुरु अर्जन देव जीनी सुरु केली. ह्यात एकूण १४३० पाने आहेत.
श्री गुरु ग्रंथ साहिब, सिखांचे जिवंत गुरु, (आदि ग्रंथ म्हणूनही ओळखले जातो) आहे. श्री गुरु ग्रंथ साहिबच्या उपस्थिती शिवाय कुठलाही सिख समारंभ व कार्य पूर्ण होत नाहीत. ग्रंथ हे गुरुमुखी लिपीत लिहिण्यात आले आहे आणि त्यात सिख गुरूंनी लिहिलेले व सांगितलेले श्लोक आहेत. कोणत्याही जिवंत व्यक्तीपेक्षा हे सर्वोच्च अध्यात्मिक आणि सिख धर्माचे प्रमुख मानले जाते.
ह्यात फक्त उपदेशच नाही तर, ३० पेक्षा जास्त हिंदू संत व मुस्लिम संतांची वाणी देखील आहे. संत कबीर, संत रविदास, संत नामदेव, साधनाजी, धन्नाजीची वाणी, शामिल आहेत.तसेच मुस्लिम संत शेख फरीदजींचे श्लोक सुद्धा आहेत.
आपल्या भाषेच्या अभिव्यकी, दार्शनिकता,संदेश मुळे गुरु ग्रंथ या एक अद्वितीय ग्रंथ आहे. भाषेची सरलता, शुद्धता, सटिकता ही जनसामान्यांनी आकर्षित करते.
गुरु वाणीने व्यक्ती आपल्या कर्माने आपले महत्व सिद्ध करू शकतो. गुरु ग्रंथ साहिब मध्ये आत्मनिरीक्षण, ध्यान, निश्रेष्ठता चे महत्व साकारलेले आहे. परंतु साधनेच्या नावावर, परित्याग, आकर्मण्यता, निश्रेष्ठताचा विरोध गुरुवाणी करते.
ईश्वर हा प्रत्येक मनुष्य प्राण्यात वसलेला आहे, फक्त त्याला शोधण्याची व अनुभवण्यची आवशकता आहे. मधुर व विनम्र व्यवहारा ने प्रत्येक मन हे जिंकता येते, ही शिकवण दिलीगेलीली आहे.
ग्रंथा मध्ये पहिल्या पाच क्रमशः वाणी (१) 'जपुनीसाणु' (जपुजी), (२) 'सोदरू' महला१, (३) 'सुणिबड़ा' महला१, (४) 'सो पुरखु', महला ४, आणि (५) सोहिला महला, नावाने प्रसिद्ध आहेत.
श्री गुरु ग्रंथ साहिब हा नेहमीच स्वच्छ रेशमी वस्त्र गुंडाळून उंच ठिकाणी ठेवलेला असतो. त्यावर चादर व पुष्प मला चढवलेली असते. ग्रंथाची आरती सुद्धा केली जाते, ग्रंथा समोर जाऊन प्रणाम केला जातो. ग्रंथाची श्रध्येपुर्वक शोभायात्रा सुद्धा काढली जाते. त्यात उल्लेख केल्या प्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न हा सिख नेहमीच करत असतो. ग्रंथाचे अखंड पठन केले जाते. ह्यात शंकाच नाही, "श्री गुरु ग्रंथ साहिब" मुळे सिखांचे जीवन हे प्रभावित झालेले आहे.