जीवनाचा मार्ग (Sikhism Way of Life)

Sikhism Way of Life

सत्य सर्व गुणांत उच्चतम आहे, सर्वश्रेठ सत्य आहे.

शिखांचे वयक्तिक जीवन, सांप्रदायिक दृष्टीकोन, सिखचे सार्वजनिक जीवन आणि जबाबदाऱ्या यात समाविष्ट आहेत.

सिख वैयक्तिक जीवनाचा दृष्टीकोन

सिखचे खाजगी जीवन यात समाविष्ट आहे.

पूजा

देवाचे मनन करणे आणि गुरु ग्रंथांच्या पवित्र ग्रंथाचे वाचन करणे.

जिवन जगणे

दहा गुरुंची शिकवण आणि गुरु ग्रंथांचे मार्गदर्शन.

रोजगार

प्रामाणिकपणे उत्पन्न मिळवणे आणि कमाईचा काही भाग स्वैच्छिक व निःस्वार्थ सेवेने गुरुंना अर्पण करणे.

सिखची दैनंदिनी

  • पहाटे लवकर उठून स्नान करणे.
  • एक देव याची आठवण करणे, वाहेगुरु नामाचा जप.
  • सकाळी- जपुजी साहिब, जाप साहिब, त्वप्रसाद सवैये यांचे पठण करणे.
  • संध्याकाळ- रेहरा साहिब.
  • किर्तन सोहिला.
  • सकाळी आणि संध्याकाळी नित नाम स्मरण करणे
  • गुरुग्रंथाचा अभ्यास करणे आणि गुरुग्रंथ वाचून शिकणे, आणि गुरमुखी लिपी लिहाणे.
  • दर महिन्याला संपूर्ण वाचन पूर्ण करण्यासाठी किंवा क्षमतानुसार गुरुग्रंथ वाचण्याचा सराव करणे.

सिख कौटुंबिक जीवन

  • गुरुंनी मार्गदर्शित केल्याप्रमाणे कौटुंबिक जीवन जगणे.
  • सिख परंपरेने सिख महिले बरोबरच लग्न करणे.
  • न जन्मलेले किंवा नवजात बाळाची हत्या हे पाप आहे असे मानणे.
  • सिख बालकाचे नाव सिख पद्धतीने ठेवणे.
  • सिख मुलाचे केस कापत नाही, ते अखंड ठेवलेले असतात.
  • मुलांना सिख परंपरेने शिकवणे.
  • सर्व सिखांना गुरुमुखी लिपी शिकणे.
  • सिख इतर धर्मांचा अभ्यास करू शकतात.
  • एक सिख फक्त आपल्या पती किंवा पत्नीशी घनिष्ट संबंध ठेवतो. इतरांबरोबरचा नातेसंबंध पालक, भावंड किंवा मुलासारखाच मानला जातो.

शीख फॅमिली