खालसा पंथ (Khalsa Army)

खालसा पंथ

“वाहे गुरुजीका खालसा ! वाहे गुरुजी की फतेह !!”

"हा खालसा परमेश्वराचा आहे. व त्या परमेश्वरा चा सदैव जय जय कार होणार"

"देवाची इच्छा असलेल्या खालसाचा जय हो! ज्याला विजय मिळतो त्या देवाची स्तुती करा"

'खालसा पंथ' म्हणजे गुरु नानकच्या शब्द निर्मल पंथ, पवित्र पंथ किंवा पवित्र मार्गाचा पंथ. हे शुद्ध अध्यात्मांचे मार्ग आहे,

आजपासून ३०० वर्षांपुर्वी भारतावर मुस्लिम राजवट होती. तेव्हाच बादशहा औरगंजेब हा क्रूर शासक होता, जो इस्लाम धर्मप्रचारासाठी लोकांना मुस्लिम धर्म स्वकारण्यास जोर व जबरदस्ती करीत. हिंदू आणि शिखांचे जिणे हराम केले होते. त्या काळात श्री गोबिंद सिंहजीचे वास्तव्य पंजाबात होते. त्यांना हे अत्याचार सहन झाले नाही. त्या अत्याचाराला उत्तर देण्याचे त्यांनी ठाणले. त्याकरता त्यांची सैन्य जमविण्यास व त्यांना सैनिकी अभ्यास देण्यास सुरवात केली. व आज्ञाही केली के भेटवस्तू म्हणून घोडे आणि हत्यारे घेऊन यावीत. हळू-हळू शस्त्रागार शास्त्राने भरून गेला. शौर्याचा 

सन १६९९ वैशाख प्रतिपदेला संघटित केलेल्या शिख समाजा मध्ये खालसा पंथाची सुरुवात झाली. खालसा जो आपल्या मानाने, शरीराने, कृतीने, आचरणाने पवित्र आहे. जो शौर्याचा प्रतीक आहे. गुरू गोबिंद सिंह यांनी दिलेल्या जीवनशैलीचे पालन करण्याचा सक्रिय निर्णय घेतला. खालसा समाजाद्वारे व्यवस्थापित केलेली जीवनशैली आहे, जी स्वयंप्रेरित आहे. श्री गुरु गोबिंद सिंहजीचे आपल्या खालसावर अतूट प्रेम होते व पूर्ण विश्वास होता. ते खालसाविषयी म्हणतात -

खालसा मेरो रूप है खास । खालसे हुं मैं करूं निवास ।। 

रेहनी रहे सोई सीख मेरा, वो साहेब मै उस्का चेरा ।।

जो शिख माझ्या विचारसरणीशी समरस असेल, तोच माझा शिष्य होय. केवळ शिष्य नव्हे तर माझा साहिब आहे. तो माझा मालक व मी त्याचा दास आहे.

सिख हे मुघल काळात खूपच अत्याचारचे शिकार झालेले होते, गुरु अर्जन देवजी याना जहांगीर राजाने अटक करून त्यांचा वध केला होता. त्या नंतर श्री गुरु तेग बहादूर यानासुद्धा मुघल राजे औरंगझेबने इस्लाम धर्म न स्वकारल्या बद्दल त्यांचे शिर कापले होते.

खालसाला नेहमीच प्रामाणिक राहण्याची आज्ञा दिली जाते, प्रत्येकास समान वागणूक द्या, देवाचे मनन करा, त्याच्यावर निष्ठा कायम ठेवा, अत्याचार आणि स्वत:ची आणि इतरांचा धार्मिक छळ सहन करू नका.

खालसाची कर्तव्ये म्हणजे शस्त्रांचा अभ्यास करणे. शासकांच्या वाढत्या छळामुळे हे आवश्यक समजले गेले आहे. खालसामध्ये सहभागी होण्यापूर्वी, बहुतेक लोक शेती, मातीची भांडी, चिनाई, सुतार, लबाना इत्यादि व्यवसायात होते.

आज, जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये आपणास खालसा आढळेल. त्यांच्या स्थानिक सोसायटीच्या सामंजस्यात राहतात परंतु त्यांच्या अध्यात्मिक गुरुांच्या मूलभूत आवश्यकतांबद्दल नेहमी जागरूक असतात.

सिखांचे राज्य (सिख साम्राज्य) चे अधिकृत नाव "सरकार-एक-खालसा" होय. ब्रिटीशांविरुद्ध झालेल्या दोन युद्धांत १८४६ ते १८९४ दरम्यान "सरकार-ए-खलसा" विसर्जित करण्यात आला.