श्री गुरू अमर दास साहिब जी- १५५२ ते १५७४ पर्यंत गुरू

गुरू अमर दास साहिब जी
श्री गुरु अमर दास साहिब जी

त्यांचा जन्म १४९७ भारतातील बसरकी येथे झाला. गुरू अमरदासांनी जातीच्या बंधने, जातीच्या पूर्वग्रह आणि अस्पृश्यतेचा यांच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न केले.

गुरु का लंगर (श्री गुरु नानक यांनी सुरू केलेल्या) मोफत जेवण, श्रीमंत किंवा गरीब, उच्च जातीत जन्मलेले किंवा कमी जातीत जन्मलेले, त्यांनी त्यांना एकत्रिक केले. अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये सामाजिक समानता स्थापित केली. श्री गुरु अमरदासांनी हिंदूंच्या पद्धती ऐवजी सिखांना वेगळ्या पद्धती नुसार विवाह सोहळा (आनंद कारज) साजरा करण्याचा मार्ग दाखविला.

त्यांनी सती परंपरा सिखांमधून पूर्णपणे नष्ट केली, ज्यामध्ये विवाहित स्त्रीला तिच्या पतीच्या अंत्यसंस्कारात आत्मदहन करण्यास भाग पाडण्यात यायचे. परदाहची प्रथा, ज्यामध्ये स्त्रीला पडदा घालून तिच्या चेहऱ्याला झाकणे आवश्यक होते ती सुद्धा सीखां मधून त्यांनी नष्ट केली.

वडिलांचे नाव: तेज भान, आईचे नाव: माता लखमी, पत्नीचे नाव: माता मनसा देवी