गुरुद्वारा श्री हरमिंदर साहिब शहर पटना येथे वसलेले आहे, जे बिहार मध्ये आहे. १६६६ या वर्षी श्री गुरु गोबिंद सिंहजींचा जन्म येथे झाला होता.
आनंदपूर साहिबला जाण्यापूर्वी त्यांनी आपले बालपण येथेच व्यथित केले. पाटणा शहराला श्री गुरु नानक देवजी आणि श्री गुरु तेग बहादूर सिंहजींनी वेगवेगळ्या वेळी भेट दिलेली आहे.
श्री गुरु तेगबहादूर साहिब जेव्हा जयपूर, आसाम आणि बंगाल दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी आपली माता गुजारीजी, मामा किरपालदासजी व कुटुंबाला येथेच वास्तव्यासाठी सोडले. हे ठिकाण सलस राय जोहरीजी यांचे निवासस्थान होते. श्री गुरु गोबिंद सिंहजींना भेटण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक लोक येथे भेट देत असत. दरबार साहिबमध्ये अजूनही माता गुजरीची विहीर सुरक्षित आहे.