सिख विधी
लग्न

विवाह करणे आणि कौटुंबिक जिवन जगणे हे शिखांचे प्राथमिक कर्तव्य मानले जाते. विवाहाच्या पवित्र संयोगाद्वारे एक दैवी प्रेम एकमेकान मध्ये सामावला जातो. सिख विवाह सोहळा 'आनंद करज' म्हणून ओळखला जातो, जो १९०९ पासून भारतीय शासनाद्वारे ओळखला गेला आहे. विवाह वेळी दहेज प्रथा विरुद्ध सिख धर्म आहे आणि लग्नाच्या प्रक्रियेदरम्यान पुरुष व स्त्रियांना समान अधिकार प्रदान करतात. समृद्ध संस्कृती आणि धार्मिक आचारसंहितांचे कठोर पालन केल्यामुळे सिख विवाह हा एक वेगळातच उत्सव म्हणून साजरा होतो.
नामकरण विधी
नामकरण हे मुनवजातबलकाचे नाव ठेवण्याचा सिख समारंभ आहे आणि हा समारंभ नेहमीच गुरुद्वारामध्ये केला जातो. सिख धर्माचे गुरु व संतांची नावांना प्राधान्य दिले जाते.
अंतिम संस्कार
सिख धर्मात मृत्यू नैसर्गिक प्रक्रिया आणि देवाची इच्छा किंवा आज्ञा मानली जाते. जन्म आणि मृत्यू जवळ-जवळ एकमेकांना अनुरूप आहेत. कारण ते "येणारे आणि जाणार" हा मानवी जिवन चक्राचा भाग आहे जे क्षणभंगुर आहे. सिख पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, आत्मा मृत्यूच्या अधीन नाही. मृत्यू ही केवळ ईश्वराजवळ जाऊन परत येण्याच्या प्रक्रिया आहे. सिख धर्मात देहअग्नी दिला जातो.
अखंड पाठ
अखंड्पाठ हे गुरू ग्रंथ साहिबचे गुरुमुखी मध्ये निरंतर पठण, सर्व श्लोक सुरूवातीपासून शेवटपर्यंत, ३१ राग, १४३० पृष्ठ आहेत, ४८ पेक्षा जास्त तासां मध्ये समुहा द्वारे (साध संगत) पूर्ण केले जाते. अखंड्पाठ करतांना अखंड्पाठ करण्याऱ्यांचे स्वर हे उंच असणे, व श्लोक हे तंतोतंत बरोबर असणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया अत्यंत पवित्र मानली जाते आणि वाचना दरम्यान लंगार उपलब्ध करण्याची परंपरा आहे. काही गुरुद्वारां मध्ये अखंड्पाठ प्रत्येक अडवाड्यात केला जातो. शिखांच्या मते हा आपल्या गुरुंच्या जवळ होण्याचा मार्ग आहे. सिख कुटुंब परिस्थितीनुसार जन्म, वैद्यकीय ऑपरेशनमधून पुनर्प्राप्ती, विवाह, मृत्यू, पदव्युत्तर पदवी मिळवणे, सारखे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणि यौद्धापूर्वी, जयंतीवर, ऐतिहासिक प्रसंगी, दुष्ट आत्मा आणि शाप इत्यादींचा पासून सुटका करण्यासाठी केला जातो.
आरदास (प्रार्थना)
आरदास म्हणजे सर्वसाक्षी, अंतर्यामी, सर्वांच्या रक्षणकर्त्या, दाता प्रभूचा आश्रय घेणे असा अर्थ होतो.
आरदास म्हणजे आत्म्याचा परम्यातशी सवांद, यांत मागणेही असते, गाऱ्हाणे ही असते, हट्टही असतो, आभारही असतात. मानवाच्या सर्व भावभावनांचे प्रतिबिंब प्रार्थनेतून व्यक्त होत असते. शिख पंथाने प्रार्थनेला 'संजिवाणी' म्हटले आहे.
अरदास ही सकाळी व सायंकाळी म्हणण्याची प्रथा आहे. ही श्री गुरु ग्रंथा बाहेरची प्रार्थना आहे.
सिख समाजाला आपल्या अस्तित्वासाठी व धर्म रक्षणासाठी सतत संघर्ष करावा लागलेला आहे. समाज संघटित राहावा म्हणून एक सामान आचारसंहिता असावी. लढण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून एका प्राथर्नेची आवशकता भासू लागलेली. ह्या पार्श्वभूमीवर आरदासची रचना करण्यात आली आहे.
सिख उत्सव
गुरपूरब

गुरूंचा प्रकाश दिवस (जन्म दिवस) हा गुरपुरब म्हणून ओळखला जाते, गुरपूरब हा १० गुरूंचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. शिखांचा हा एक पवित्र सणांपैकी एक आहे. या दिवशी खास प्राथर्ना सभांचे, अखंड पाठचे, प्रभात फेरिंचे आयोजन गुरुद्वारां मधून केले जाते.
जन्मदिनाच्या एक दिवस अगोदर नागरकीर्तनाचे आयोजन केले जाते. या मिरवणुकीचे नेतृत्व निशाण साहिब घेऊन पंचप्यारे व मागे गुरु ग्रंथ साहिबांची पालकी असते. गुरुद्वारांमधून लंगरचे आयोजन भक्तांसाठी, भक्तिभावाने सेवा म्हणून केले जाते.
वैशाखी

वैसाखी ज्याला विशाखी किंवा विसाखी म्हणूनही ओळखले जाते तो शिखांचा ऐतिहासिक व धार्मिक उत्सव आहे. सामान्यतः १३ किंवा १४ एप्रिलला हा उत्सव साजरा केला जातो, जो १६९९ मध्ये गुरु गोबिंद सिंह यांच्या खालसा पंथाची सुरुवात केली. हिंदू धर्मात, वैशाखी, सौर नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. हे हिंदू आणि सिखांसाठी वसंत ऋतु कापणीचे उत्सव आहे.
वैसाखी हा पंजाब प्रदेशातील लोकांसाठी एक कापणीचा उत्सव आहे. पंजाबमध्ये, वैशाखी रब्बी हंगामाच्या पिकांचे प्रमाण दर्शवते. वैसाखीही पंजाबी नववर्षी चिन्हांकित करते. शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणात कापणीसाठी देवाचे आभार मानतात आणि भविष्यातील समृद्धीसाठी देखील प्रार्थना करतात.
मुगल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार नववे गुरु, श्री तेग बहादूर यांचा छळ व वध सिख धर्माच्या स्वातंत्र्यासाठी आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकारदिल्या मुळे करण्यात आला त्याचे स्मरण या दिवशी केले जाते.
वैशाखीच्या दिवशी ब्रिटिश साम्राज्या कडून जळियावाला बाग नरसंहार सन १६९९ मध्ये केला गेला होता.
वैसाखीच्या दिवशी, गुरुद्वारांवर सजावट केली जाते आणि अखंडपाठ, लंगर, कीर्तनाचे आयोजन केले जाते, आणि नदीमधून पवित्र स्नान केले जाते.
बंदी छोर दिवस

बंदी छोर दिवस ("मुक्तिचा दिवस"), जो दिवाळीच्या दिवशी येतो. सिख ऐतिहासिकदृष्ट्या दिवाळी हिंदूंसह दिवाळी साजरे करतात, गुरु अमरदासांनी शिखांसाठी हा उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात सिख धार्मिक नेत्यांनी दिवाळीला बंदी छोर दिवा म्हणून नामांकित केले आणि शिरोमणि गुरुद्वारा प्रशासक समितीने २००३ मध्ये नानकशाही कॅलेंडरसह हे नाव स्वीकारले. सिख इतिहासाच्या मते, या दिवशी, श्री गुरु हरगोबिंद साहेबजी यांना, मुगल सम्राट जहांगीर याने तुरुंगातून सोडले होते, त्याने ५२ अन्य हिंदू राजांना सुद्धा आपल्या बरोबर मुक्त केले होते.
वैसाखी, माघी, होळी, होला महला आणि गुरुपुरबसह हा एक महत्त्वाचा सिख उत्सव आहे
होला महला

होला महला (पंजाबी: होला महल्ला, हिंदी: होला महला), याला होला देखील म्हणतात, हा एक-दिवसीय सिख उत्सव आहे जो बऱ्याचदा मार्चमध्ये येतो, आणि हिंदू वसंत ऋतूच्या होळीच्या एक दिवसानंतर होली परंतु कधी-कधी. होला मोहल्लाही जगभरातील सिखांसाठी शौर्याचा मोठा उत्सव आहे.
आनंदपूर साहिब येथे हा मेळावा पारंपारिकपणे तीन दिवसांचा कार्यक्रम असतो, या दिवशी लढाऊ कौशल्य आणि बहादुरीचे विविध प्रदर्शन करणे आणि भजन-कीर्तन, संगीत, अर्धास, आणि लंगरचा आनंद घेतला जातो.