
"गुरुद्वारा" म्हणजे गुरुचे द्वार, हे शिखांचे सभास्थान आणि उपासनेचे ठिकाण आहे.
सर्व धर्मांतील लोक आणि जो कोणी विश्वास ठेवतो, त्यांचे सिख गुरुद्वारामध्ये स्वागत आहे. प्रत्येक गुरुद्वारामध्ये दरबार साहिब आहे जेथे सिखांचे वर्तमान आणि सार्वकालिक गुरु "श्री गुरुग्रंथ साहिब" एका प्रमुख तख्तावर विराजमान झालेले असतात. समूहाच्या उपस्थितीत श्री गुरुग्रंथ साहिबच्या श्लोकांचे गायन व वर्णन करतात.
गुरुचा लंगर
सर्व गुरुद्वारामध्ये एक लंगर हॉल असतो, येथे लोकांना मोफत शाकाहारी भोजन दिले जाते.
जगातील सर्वात मोठा धर्मदायी मोफत लंगर (गोल्डन टेम्पल मधील गुरु रामदास लंगर हॉल)
![]() |
||||
|
निशान साहिब
प्रत्येक गुरुद्वारा वर निशान साहिब, सिख ध्वज उंच ठिकाणी लावलेला असतो, जो लांब अंतरावरुन एक गुरुद्वारा आहे, म्हणून ओळखला जाऊ शकतो.
गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने आपले दोन्ही हात व पाय धुवावेत. शिवाय, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्री दोघांनी आपले मस्तकं स्वछ कापडाने झाकले पाहिजेत. आपण हे करणे आवश्यक आहे कारण शिखांचा असा विश्वास आहे की आतां तुम्ही गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वच्छ आहात, व तुम्ही गुरुद्वाराचा आदर करण्यास तयार आहात. गुरुद्वाराच्या आत एक बाजूस पुरुष व दुसऱ्या बाजूला महिलांना बसण्याची जागा असते. पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील फरक अनिवार्य आहे, आणि सिख नसलेल्याना देखील या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रथम गुरुद्वारा, हा पंजाबात रावी नदीच्या काठी १५२१ साली प्रथम गुरु सिख गुरु, श्री गुरु नानक देव यांनी करतरपूर येथे बांधला. हे ठिकाण सध्या पश्चिम पंजाब (पाकिस्तान) च्या नारोवाल जिल्ह्यात आहे.
पूजा केंद्रे अशा ठिकाणी बांधली गेली, जिथे सिख गुरु आध्यात्मिक प्रवचन देऊ शकतील आणि वाहेगुरुंची स्तुतीसाठी धार्मिक भजन करतील. गुरुद्वारामध्ये एक मुख्य हॉल आहे, ज्याला दरबार म्हणतात, येथे स्वयंपाकघर, आणि इतर सुविधा असतात.
गोलक (Donation Box)

गोलक किंवा गुरू की गोलक हे शब्द श्री गुरु ग्रंथ साहिबच्या समोर ठेवलेली दानपेटी, जेथे गुरु ग्रंथ समोर गुडघे टेकण्यापूर्वी किंवा वाकण्याआधी स्वइच्छेने दान केले जाते. गरिबांचे पोषण करणे म्हणजे गुरूच्या गोलक्यात योगदान देणे होय. गुरू की गोलक हे धार्मिक व ऐतिहासिक सिख परंपरा आहे. संस्थापक, गुरु नानक यांनी स्वत: ही सुरु केली होती.
पाच तख्त म्हणजे सिंहासन (Five Takht)
सिखांमध्ये तख्त किंवा ताता (पंजाबी: ताख्त), याचा शाब्दिक अर्थ म्हणजे सिंहासन किंवा आसन. सिख धर्मात पाच तख्त आहेत आणि हे तख्त पाच गुरूद्वारा आहेत ज्यांचे सिख समुदायासाठी अतिशय विशेष महत्त्व आहे. ते सिख धर्माच्या ऐतिहासिक वाढीचे परिणाम आहेत आणि धर्माच्या शक्तीचे केंद्र आहेत.
- अकाल तख्त साहिब (द गोल्डन टेम्पल)- अमृतसर पंजाब, भारत
- तख्त श्री केसगढ साहिब- आनंदपूर साहिब, पंजाब, भारत
- तख्त श्री दमदमा साहिब- बठिंडा, पंजाब, भारत
- तख्त श्री हरिमंदिर पटना साहिब- पटना, बिहार, भारत
- तख्त श्री हजूर साहिब- नांदेड महाराष्ट्र, भारत




